मंदिरातील रुढी आणि परंपरा

Read this page in English

कडापे येथील मंदिरात आणि मंदिर परिसरात काही परंपरांचे पूर्वापारपासून पालन केले जाते. भक्तांनी या सर्व रुढी आणि परंपरांचे पालन करावे अशी देवस्थान समितिची विनंती आहे.

मंदिर परिसरात शिरल्यावर भक्तांनी हात-पाय धुणे आवश्यक आहे.

मुख्य मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी पुरुषांनी राहुटी मंदिरात श्री गोसावीबुवांचे दर्शन घ्यावे. येथे कापूर आणि अगरबत्ती लावावे. गोसावीबुवांना नारळ अर्पण करुन तो नारळ फोडावा. त्या फोडलेल्या नारळाच्या वरच्या भागातून पाच तुकडे काढून ते श्री गोसावीबुवांना नैवेद्य म्हणून अर्पण करावे.

महिलांना राहुटी मंदिरात जाण्याची अनुमती नाही. 

राहुटी मंदिरातील विधिवत पूजा आणि दर्शनानंतर भक्तांनी पुन्हा हात-पाय धुवावे आणि त्यानंतरच मुख्य मंदिरात प्रवेश करावा.

भक्तांनी मंदिर परिसरात शिस्त पाळावी. येथे सिगारेट / विडी ओढणे, तंबाखूयुक्त पदार्थ खाणे आणि मद्यपान यांना संपूर्ण बंदी आहे याची कृपया नोंद घ्यावी.

मुख्य मंदिराच्या गाभार्‍यात खालील गोष्टी नेऊ नयेत.

काळे कपडे घालून गाभार्‍यात प्रवेश करुन नये.

स्त्रियांच्या मंगळसुत्राव्यतिरिक्त इतर कोणतीही काळी वस्तू गाभार्‍यात नेऊ नये.

चामड्याच्या वस्तू (कमरेचा पट्टा, पाकिट, पर्स वगैरे) गाभार्‍यात नेऊ नयेत.

मुख्य मंदिरातील देवतांचे दर्शन खालील क्रमानुसार घ्यावे :

श्री बापुजीबुवा सर्वप्रथम श्री बापुजीबुवांचे दर्शन घ्यावे. त्याची विधिवत पुजा करुन त्यांना नारळ, धोतर आणि/किंवा उपरणे अर्पण करावे. त्यानंतर नैवेद्य अर्पण करावा.

श्री कालिकाई – श्री कालिकाईची पुजा करुन तिला साडी किंवा खण-नारळाची भरावी. त्यानंतर नेवेद्य अर्पण करावा.

 

यानंतर खालील क्रमाने इतर देवतांचे दर्शन घेऊन त्यांची पूजा करावी

श्री बहिरीबुवा
श्री म्हाळसा आणि श्री खंडोबा
श्री बाणाई
श्री भवानी
श्री वाघजाई
श्री जरीआई
श्री मरीआई

मुख्य मंदिरातील सर्व देवतांचे दर्शन आणि पूजा केल्यानंतर श्री शंकर महादेव मंदिरातील देवतांचे दर्शन घ्यावे व त्यांची पूजा करावी.


श्री. प्रमोद देशपांडे मंदिरातील रुढी आणि परंपरा सांगत असताना..


सौ. आसावरी खोपकर मंदिरातील देवतांच्या पूजेविषयी तसेच देवतांना दाखविण्याच्या नैवेद्याची माहिती देताना ..