मंदिरात होणारी धार्मिक कार्ये
दैनिक धार्मिक कार्ये
मंदिरात दररोज विविध धार्मिक विधी, पूजा वगैरे केले जातात. यासाठी संस्थेने पुजार्यांची व्यवस्था केली आहे.
सकाळी सर्व देवतांची विधिवत पूजा करुन मुर्तींना वस्त्रे, अलंकार वगैरे चढविले जातात. यानंतर भाविक येथे दर्शन घेऊ शकतात.
दुपारी आणि संध्याकाळी मदिरात सर्व देवतांची आरती होते.
अभिषेक आणि कुंकुमार्चन हे विधी सकाळी मुर्तींना वस्त्रे आणि अलंकार चढविण्यापूर्वी केले जातात. ज्या भक्तांना हे विधी करायचे असतील त्यांनी त्याची माहिती आधी देवस्थानला कळविल्यास योग्य ती सोय करता येईल. यासाठी आमच्याशी पौन किंवा इ-मेलद्वारे संपर्क करता येईल.
वार्षिक उत्सव आणि धार्मिक कार्ये
देवस्थानतर्फे खालील उत्सव साजरे केले जातात, तसेच खाली उल्लेखलेली धार्मिक कार्ये केली जातात.
महाशिवरात्र
चैत्रपौर्णिमा
नवरात्र
लघुरुद्र
नवचंडी हवन
श्री सत्यनारायण पूजन
या उत्सवकाळात भक्तगणांना विनंती आहे की इतर सर्व भक्तांच्या सोयीसाठी त्यांनी आपापले कुलधर्म / देवकार्ये मंदिरात करु नयेत.