नवीन मंदिर प्रकल्प

new-mandir

समस्त परमपूज्य भक्तगण हो…

आपण सर्वांस श्री बापुजीवुवा श्री कालिकाई देवस्थान कडापे या मंदिराचा महिमा गत ५० वर्षे ज्ञातच आहे. आपण सर्वानी आपल्या आनंदाच्या क्षणी या मंदिरात येऊन देवाचरणी सविनय आशिर्वाद घेतले आहेत. तसेच अनेक संकटांच्या वेळी या आदिशक्तीचा धावाही केलेला आहे. वेळोवेळी आपल्या सर्वांसाठी धावत येऊन या कुलमालेने आपले मातृत्व सिद्ध केले आहे.

आता आपली उपकृत होण्याची वेळ आली आहे. आपल्या या इष्टदेवतांच्या मंदिराची इमारत ५० वर्षे जीर्ण झाली आहे. अतिपर्जन्य वृष्टीमुळे ह्या मंदिराच्या कळस गेले २० वर्षे गळत आहे. कळस दुरुस्तीचे सर्व प्रयत्न निष्कळ ठरले आहेत. आता पर्याय एकच उरला तो म्हणजे मंदिराचा जिर्णोद्धार करणे.

संस्थेची कार्यकारीणी आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या मंदिराचा जिर्णोद्धार व प्रशस्त मंदिराचे नवनिर्माण करण्याचा धाडसी संकल्प आईचरणी सोडत आहे. नविन मंदिर पूर्णपणे ढोलपुरी दगडाने बांधले जाणार आहे. या भव्य मंदिरासाठी येणारा खर्च अंदाजे पाच कोटी रुपये इतका आहे. सुप्रसिद्ध आर्किटेक्ट श्री. जयंतराव चिंतामणी टिपणीस हे आपल्या मंदिर जिर्णोद्धार समितीचे अध्यक्षपद भुषवित असून या पवित्र कार्यासाठी त्यांचा आर्थिकदृष्ट्या देखील सिंहाचा वाटा आहे. कार्यक्रम राबविण्यासाठी श्री बापुजीबुवा श्री कालिकाईचे आशिर्वाद आहेतच परंतु त्याचबरोबर आपणा सर्वांच्या आर्थिक सहकार्याची गरज आहे. आपल्या बहुमुल्य सहकार्याने आपण आपले श्रद्धास्थान अधिक बळकट करून आपल्या कुलदैवतांची सेवा करण्याची संधी घेऊया.

श्री बापुजीबुवा श्री कालिकाई चरणी असलेला आपल्या सर्वांचा विश्वासच आपल्या सर्वांना हे भव्य कार्यपूर्तीसाठी बळ देईल. कृपया आपण आपले अर्थसहाय्य संस्थेच्या बँक खात्यात जमा करून मदतीचा हात पुढे करावा.

आपले विनम्र,

अध्यक्ष: मंदिर जिर्णोद्धार समिती
अध्यक्ष : श्री बापुजीबुवा श्री कालिकाई देवस्थान संस्था, कडापे
कार्याध्यक्ष: देवस्थान कार्यकारणी
कार्यकारणी सदस्य: देवस्थान कार्यकारीणी
विश्वस्त: श्री बापुजीबुवा श्री कालिकाई देवस्थान संस्था, कडापे