पुढील वाटचाल आणि संकल्प

Read This Page in English ..

new-mandirदेवस्थानच्या वतीने हाती घेण्यात येणारा यापुढील काळातील अतिशय महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे कडापे येथे नवीन शक्तिपीठ मंदिराची उभारणी. अतिशय भव्य आणि सुंदर अशा या मंदिराच्या उभारणीच्या कामासाठी सुप्रसिद्ध वास्तुविशारद श्री जयंतराव टिपणीस यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची नेमणूक झाली असून या मंदिराच्या संकल्पित आराखड्याचे काम सुरु आहे.

नवीन मंदिर ऊभारण्याच्या आमच्या प्रकल्पाला सर्व भक्तगणांनी साथ द्यावी अशी सर्वांना विनंती आहे.
[पुढे वाचा]


कडापे आणि आसपासच्या ग्रामस्थांसाठी धार्मिक आणि इतर उपयोगी पुस्तकांचे एक वाचनालय सुरु करण्याचा मानस आहे.

मंदिर परिसरात पाणीपुरवठ्यासाठी बोअरवेल खोदण्यात येणार आहे.

कडापे आणि आसपासच्या भागातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची सोय होण्यासाठी एका अभ्यासिकेची व्यवस्था देवस्थानतर्फे करण्याचे ठरविले आहे.

देवस्थानतर्फे वेळोवेळी वैद्यकीय तपासणी शिबिरे आयोजित केली जातात. याच्याच जोडीला कडापे येथे नियमित स्वरुपाची वैद्यकीय मदत देण्यासाठी एका आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे.


देवस्थानचे विश्वस्त श्री. शशीकांत गुप्ते संस्थेच्या आगामी कार्यक्रमांसंबंधी माहिती देताना.