देवस्थान विश्वस्त मंडळाचे कार्य

Read this page in English

कडापे येथील मंदिराच्या व्यवस्थेसाठी विश्वस्त मंडळाची १९६८ साली स्थापना झाल्यानंतर सध्याचे मुख्य मंदिर आणि श्री शंकर महादेव मंदिराची बांधणी केली गेली.

२००६ साली श्री बहिरीबुवा, श्री म्हाळसा, श्री खंडोबा, श्री बानाई, श्री वाघजाई, श्री जरीआई, श्री मरिआई यांच्या मुर्तींची पुनर्प्रतिष्ठापना शास्त्रोक्त विधींसहित करण्यात आली. सर्व जुन्या मुर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले.

२००९ मध्ये नवीन भक्त निवासाचे उदघाटन झाले. या भक्त निवासात तळमजल्यावर प्रशस्त सभागृह असून त्याचा उपयोग वार्षिक उत्सव, विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी करण्यात येतो. भक्तनिवासाच्या मॅझनीन मजल्यावर ध्यानमंदिर आहे. त्यावरील मजल्यांवर भक्तांसाठी निवासाची व्यवस्था आहे. येथे एसी आणि नॉन-एसी अशा दोन्ही प्रकारच्या खोल्या उपलब्ध आहेत. स्नानगृह आणि प्रसाधनगृहाची व्यवस्था आहे.

देवस्थानतर्फे अनेकवेळा मंदिर परिसरात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कडापे गावातील गरजू मुलांना देवस्थानतर्फे पुस्तके, वह्या, शाळेचा गणवेश इत्यादिंचे वाटप नियमितपणे केले जाते.
गरजू व्यक्तींना देवस्थानतर्फे वैद्यकीय मदत करण्यात येते. ही मदत रोख स्वरुपात असते.

सर्व वार्षिक उत्सव आणि कार्यक्रमात भक्तांना महाप्रसाद मोफत दिला जातो.


विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री. विजय वैद्य हे देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या कार्याविषयी माहिती देताना…